डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३१व्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

 

लोकदर्शन उस्मानाबाद ;👉 राहुल खरात

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या, जयंती निमित्त उस्मानाबाद शहरातील जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१४एप्रिल रोजी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी भव्य मंडप उभा करून डाॅ.बाबासाहेब यांचे प्रतिमेला शेकडोंच्या संख्येने अभिवादन केले होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्ह्याचे माहिती अधिकारी मा. यशवंत भंडारे साहेब उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून मा . सुरेश तायडे
(गटविकास अधिकारी पं. स. उस्मानाबाद), मा. अश्वजित जानराव
(जिल्हा बस वाहतूक नियंत्रक, उस्मानाबाद), मा. कल्याणराव गेटे (डी.वाय.एस.पी.उस्मानाबाद),
मा. तानाजी दराडे (पोलिस निरिक्षक,आनंद नगर पोलीस स्टेशन ,उस्मानाबाद), या अधिकारी यांचे बरोबरच,महेंद्र दुरगुडे (जि. प सदस्य,उस्मानाबाद),
मा लोखंडे राहुल आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.प्रारंभी वरील मान्यवरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले.याप्रसंगी
बुधवांदना व पंचशील जेतवन काॅलनी,येथील महिला मंडळाने घेतले.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक रमाकांत गायकवाड यांनी केले.
यावेळी यशवंत भंडारे साहेब,
तायडे साहेब ,गेटे साहेब,दराडे साहेब, दुरगुडे महेंद्र यांनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी प्रा.डी.एम.शिंदे(समाजशास्ञ विभाग प्रमुख ,आर.पी.काॅलेज), बाबासाहेब मस्के,
जेतवन माहीला बचत गटाच्या महिलांनी लाडू व नाष्टा वाटप केला.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी जेतवन काॅलनी, शाहूनगर जयंती ऊत्सव समितीचे अध्यक्ष
शिंगाडे राजरत्न ,
गायकवाड रमाकांत सचिव,
कांबळे रमेश उपाध्यक्ष,
संपत शिंदे ,प्रा.राजा जगताप,ओव्हाळ अशोक,माने बाळासाहेब ,वाघमरे नाना,मारूती पवार ,गायकवाड सुधीर,वाघमारे सर,वावळकर साहेब,राम चंदनशिवे ,शिंदे भारत ,स्वप्नील शिंगाडे ,प्रमोद चंदनशिवे,आदींनी सहकार्य केले.
सूत्रसंचलन प्रा चंदनशिवे राम यांनी केले तर आभार मस्के बाबासाहेब यांनी मानले यावेळी शाहूनगर येथील युवक,महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त जेतवन काॅलनी,शाहूनगर येथे २३एप्रिल रोजी,सायंकाळी ५ते१०=०० या वेळेत लोकशाहीर संभाजी भगत व सहकारी(मुंबई) यांचा “विद्रोही आंबेडकरी शाहीरी जलसा” याचे आयोजन केल्याने या कार्यक्रमाचा लाभ उस्मानाबाद व परिसरातील नागरिकांना घ्यावा असे आवाहन शाहूनगर जयंती उत्सव,अभिवादन,प्रबोधन समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *