सतीश दांडगे यांच्या निधनाने निष्ठावंत कार्यकर्ता हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सतीश दांडगे पाटील यांच्या निधनाने पक्षनिष्ठ , निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची शोकभावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

अनेक संघटनात्मक पदांना त्यांनी योग्य न्याय दिला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचा दांडगा अभ्यास त्यांना होता.समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती. त्यातून अनेक कार्यकर्ते त्यांनी पक्षाशी जोडली. त्यांच्या निधनाने भाजपा परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो व त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो , असेही आ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here