लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉 महादेव गिरी
-◆ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले.विजयी उमेदवारांसह पॅनल प्रमुखांनी विजयानंतर जल्लोष केला.
वालूर,ता.18:
राव्हा(ता.सेलू) गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी(ता.१७) घोषित करण्यात आला.यात शेतकरी विकास पॅनलने संस्थेवर आपले वर्चस्व कायम राखले.
निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र राठोड यांनी विनायक आंधळे, रामा भोजणे,त्रिंबक बुधवंत,दिगांबर गुठ्ठे, बन्सी शिंदे,मारोती शिंदे,रमेश शिंदे,रामेश्वर शिंदे,शोभाताई आंधळे,उषाताई निकम,आसाराम दराडे, भिका चौरे या बारा उमेदवाराना विजयी झाल्याचे घोषित केले.
बाबुराव केशरखाने हे या पूर्वीच बिनविरोध निवडून आले.सेवा सहकारी संस्थेवर
शेतकरी विकास पॅनलचे विजयी परंपरा कायम राखण्यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे समर्थक माजी सरपंच सदाशिव निकम यांच्यासह रमेश भोजणे,सदाशिव आंधळे, विद्यमान चेअरमन भाऊसाहेब आंधळे, प्रकाश आंधळे,शिवाजी बुधवंत,अंजाराम बुधवंत, विष्णू बुधवंत,रामराव शिंदे,बाबासाहेब शिंदे, तुकाराम गुठ्ठे,शिवाजी सारूक,बाळू देवकते, राम देवकते,सतीश सारुक,डिगंबर बुधवंत यांनी पुढाकार घेतला.
पॅनलचे वर्चस्व कायम राखल्याने विजयी उमेदवार व पॅनल प्रमुखांनी विजयानंतर आनंदात जल्लोष केला.