लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गोंडपिपरी तालुक्यात १ कोटी १० लक्ष रुपये निधी च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत चेक बेरडी येथील वाचनालय इमारत बांधकाम करणे २० लक्ष, मौदा वडोली येथे वाचनालय इमारत बांधकाम करणे २० लक्ष, मौजा वडोली येथे शेतकी शाळेच्या पाठीमागून ते कराड पेठ डांबर प्लांट पर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम करणे २० लक्ष, मौदा चेक बोरगाव येथे वाचनालय इमारत बांधकाम करणे २० लक्ष, विकास निधी अंतर्गत मौजा ग्रामपंचायत कोरंबी अंतर्गतच एक विठ्ठल वाडा येते श्री गुरुजेकर यांचे घर ते भाऊजी दिवसे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट सिमेंट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष, मौजा गोंडपिपरी येते व्यायाम शाळेचे इमारत बांधकाम करणे २० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, चेक बेरडी येतील सरपंच मीनाक्षीताई खरबंकर, उपसरपंच पल्लीकाताई सोयाम, वढोलीचे सरपंच राजेश कवठे, चेक बोरगाव येथील अनुसूचित जाती /जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष गौतम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशोकराव रेचनकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, दरुर चे सरपंच बालाजी चनकापूर, मायाताई मडावी प्रशांत कन्नाके, विलास कोपरे वासुदेव झाडे, पांडुरंग कोहपरे, विलास कोहपरे, वासुदेव झाडे, दीपक जी , लक्ष्मीबाई बक्षी, उपविभागीय अभियंता वैद्य सर यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.