By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
वन कर्मचारी वसाहतीत
आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
नागपूर दि. १६ एप्रिल २०२२
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि स्त्री- पुरुष समानतेचा अधिकार प्रदान केल्यामुळेच महिलांना आपले वर्चस्व सिद्ध करता आले, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
सेमिनरी हिल्स येथील वन कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
मंचकावर सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक जरनेलसिंग, खापलिया, नगरसेविका प्रगती पाटील, सुभाष डोंगरे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार माझ्या नसानसात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनला असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष राजेश लाडे, प्रदीप मसराम, राजेश सोनकुसरे, जी. जे. कांबळे, सुखदेवे, राजेश्वरी वानखेडे, गंगा कांबळे, ममता लाडे, सोनाली मेश्राम, रसिका ढाकुलकर, सोनाली कांबळे, अर्चना रामटेके, कल्पना चिंचखेडे, स्नेहा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.