जनसहकार्यातून वाघ बंदोबस्ताची मोहिम यशस्वी करा. आमदार सुभाष धोटे यांच्या वणाधिकाऱ्यांना सुचना.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕वनाधिकारी, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक संपन्न.

गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तोहोगाव परिसरातील वाघाच्या हल्ल्यामुळे जनता भयभीत असून स्थानिक जनतेच्या सहकार्यातूनच वन विभागानी योग्य नियोजन करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मोहीम यशस्वी करावी. जनतेला भयमुक्त करावे तसेच वाघाचे हल्ल्यात जखमी झालेल्या कुटूंबाना तसेच ज्या पशुपालकाचे जनावरे ठार केले त्या पशुपालकांना तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी सूचना आमदार सुभाष धोटे यांनी वणाधिकाऱ्यांना केले आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगांव, आर्वी, वेजगाव भागात मागील आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घालीत दोन इसमावर हल्ला करून जखमी केले तर १५ पाळीव जनावरे ठार केले यामुळे परिसरात दहशत असून जनतेत संताप व्यक्त होत आहे. प्रकरण अधिक तीव्र होऊ नये आणि यावर उपाययोजना करण्याबाबत आमदार सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली वन विभाग, पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत मुख्यवनसरक्षक प्रकाश लोणकर, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तहसीलदार के डी मेश्राम, वन प्रकल्प चे विभागीय वन अधिकारी विवेक मोरे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, कोठारी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण, धाबा चे ठाणेदार सुशील धोकटे, लाठीचे ठाणेदार फाल्गुन घोडमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे, सचिन वाघमोडे हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच तोहोगावचे सरपंच अमावस्या ताडे, लाठीचे उपसरपंच साईनाथ कोडापे, सरपंच मनीषा वाघाडे, वनिता रागीट, फिरोज पठाण, प्रकाश उत्तरवार, नीलकंठ रागीट, मदन खामनकर, प्रवीण मोरे आदी स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी वाघाच्या हल्ल्या संदर्भात केलेल्या उपाययोजना बाबत वणाधिकार्यानी माहिती दिली तर नागरिकांनी वाघाचे सतत होणारे हल्ले व अल्पशी आर्थिक मदत, जळाऊ निस्तार लाकडे व शेती सरक्षणाकरिता सौर कुंपण ची मागणी बाबत समस्या मांडले.

==================================
कोट :–
आमदार सुभाष धोटे यांनी वाघ हल्ल्यापासून नागरिक व पाळीव जनावरे कसे सुरक्षित राहतील तसेच वन्यप्राणी हल्यात जखमींना तात्काळ मदत देण्याबाबत सूचना दिल्या व जनतेनेही वणाधिकार्याच्या सहकार्यातून याचे नियोजन करण्याचे सूचना केल्यात. जनतेनेही वणाधिकाऱ्यांना योग्य सहकार्य करावे तसेच वनविभागांनी शेती संरक्षण सौर ऊर्जा कुंपण योजना प्रभावी राबवून वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीची मदत तात्काळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
— आमदार सुभाष धोटे.

वाघ जेरबंद करण्यासाठी पोलीस वनकर्मचारी संयुक्तपणे मोहिमेत योग्य उपाययोजना सुरू असून tv जनतेनेही सहकार्य करावे.
– प्रकाश लोणकर, मुख्यवनसंरक्षक.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *