जगातील सर्वांग सुंदर अशा भारतीय संविधानातील मानवी मुल्‍ये जपत कष्‍टकरी जनतेला न्‍याय द्या – आ. सुधीर मुनगंटीवार                                                       

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕नेरी (कोंडी) आंबेडकर चौक दुर्गापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त कुलजारचे वाटप*

विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे आणि जो कोणी ते प्राषन करेल तो गुरगुरल्‍या शिवाय राहणार नाही. त्‍यामुळे वाघासारखे जिवन जगणं हा खरा पुरुषार्थ आहे. शोषित, वचिंतांसाठी जय भीम म्‍हणत संघर्ष करणे हे आमचे कर्तव्‍य आहे. संविधानामधील असणा-या आपल्‍या कर्तव्‍याची, दायित्‍वाची जाणीव ठेऊन बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्‍याचा संकल्‍प आपण करुया, असे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त बोलत होते.

दिनांक 14 एप्रिल 2022 रोज गुरुवारला नेरी (कोंडी) आंबेडकर चौक दुर्गापूर येथे आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या प्रसंगी भाजप नेते रामपाल सिंग, भाजपा चंद्रपूर तालुका अध्‍यक्ष हनुमान काकडे, जिप च्या माजी सभापती रोशनी खान, वनिता आसुटकर, केमा रायपुरे, विलास टेंभुर्णे, श्रीनिवास जंगम, नामदेव आसुटकर, अतुल पोहाणे, मदन चिवंडे, देवानंद थोरात, संजय यादव, राकेश गौरकार, श्रीकांत देशमुख, फारुख शेख, सुनिल बरेकर, महेंद्र रहांगडाले, घनश्‍याम यादव, दीपक पाठक, अनिता भोयर, अमर शर्मा, कुलनकर, चौधरीताई, महेंद्र लांबट आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

आ.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, जगातील सर्वांग सुंदर अशा भारतीय संविधानातील मानवी मुल्‍ये जपत कष्‍टकरी वर्गाला अन्‍न, वस्‍त्र, निवारा उपलब्‍ध करुन देणे हा भारतीय जनता पार्टीच्‍या कार्यकर्त्‍यांचा संकल्‍प असला पाहीजे, आम्‍ही सत्‍तेसाठी नाहीतर सेवेसाठी कार्य करु, निवडणुक जिंकण्‍यासाठी नाही तर सामान्‍य जनतेचे मन जिंकण्‍याचे लक्ष व उदि्दष्‍ट ठेवु.

जगातील सर्वात उष्‍ण असलेल्‍या चंद्रपूर शहरामध्‍ये कष्‍टक-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त थंड पाण्‍यासाठी कुलजार वाटप करताना अतिशय आनंद होतो आहे. या कुलजारचे प्रत्‍येकाला वाटप होईल याची कार्यकर्त्‍यांनी काळजी घ्‍यावी. ऑटोरिक्षा चालकांना सुध्‍दा कुलजारचे वाटप होईल. गोरगरिब, शोषित, वंचितांना कायमच प्राधान्‍याने न्‍याय देण्‍यात येईल. उन्‍हापासून बचाव करण्‍यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे छत्री वितरण करण्‍यात येईल. गरिबांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी आरोग्‍य शिबीर, नेत्र शिबीर घेत गरिबांच्‍या कुटूंबासोबत कायमच मी असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याचे कार्य मी कायमच करेन, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *