गुरुकुंज आश्रमाचे नुतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕अ भा गुरुदेव सेवा मंडळाची मध्यवर्ती प्रतिनिधी सभा सम्पन्न*

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची संधी मला अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे. नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्याच्या प्रक्रियेत मी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून आपले योगदान देऊ शकलो याचे विशेष समाधान आहे.ज्या अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या त्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्या साठी मी प्रयत्नांची शर्थ करेन. निष्काम भावनेने हे पद स्वीकारले त्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही अ भा गुरुदेव सेवा मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दि 15 एप्रिल 2022 रोजी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी आश्रमात मध्यवर्ती प्रतिनिधी सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले , ही बैठक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होत आहे. ग्राम विकासाच्या दृष्टीने मुलभूत विचारांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.इमारतीचे नुतनीकरण तसेच पुनःबांधणी
करण्यासाठी निश्चितपणे कालबद्ध कार्यक्रम आखू. महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता दारूबंदी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत या बाबत अशासकीय विधेयक आपण मांडणार असल्याचे ते म्हणाले.काल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती, आज हनुमान जयंती .बाबासाहेबांचा सामाजिक न्यायाचा व हनुमानजींचा सेवेचा विचार एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी सिद्ध होऊ असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष माजी आमदार सौ पुष्पाताई बोडे उपस्थित होत्या.

यावेळी प्रास्ताविकात श्री वाघ यांनी आ. मुनगंटीवार यांनी नागपूर विद्यापीठाच्या नामविस्तारा साठी केलेल्या प्रयत्नांबाबत माहिती देत काही अपेक्षा व्यक्त केल्या.आश्रमाचे नूतनीकरण करण्या संदर्भात त्यांनी विशेष भर दिला.या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ही सामूहिक प्रार्थना झाली. संचालन जनार्धनपंत बोथे यांनी केले. सभेला मध्यवर्ती प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *