लोकदर्शन 👉 मोहन भारती
*राजुरा*-गोंडवाना विद्यापीठाची शैक्षणिक विकासाकडे निरंतर वाटचाल होत असली तरी या विद्यापीठाच्या परिक्षेत्रा मध्ये संशोधनाला वाव आहे या भागातील साधन संसाधने,वारसा ऐतिहासिक मूल्ये, क्रीडा व विविधांगी ज्ञानवर्धन स्त्रोत लक्षात घेता शारीरिक शिक्षण व ग्रंथालय शास्त्र या विषयासाठी अधिकचे संशोधन केंद्र देण्याची मागणी गोंडवाना असोसिएशनने निवेदनाच्या माध्यमातून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचेकडे केली असून संघटनेच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात नुकतीच त्यांची भेट घेतली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रा मध्ये शारीरिक शिक्षण व ग्रंथालय शास्त्र या विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम नाहीत विशेष म्हणजे ग्रंथालय शास्त्र विषया करता केवळ एक संशोधन केंद्र आणि शारीरिक शिक्षण विषयासाठी एकच संशोधन केंद्र आहे.त्यामुळे सदर विषयात संशोधन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असून सदर विषयासाठी संशोधन करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना नागपूर व अमरावती येथील संशोधन केंद्रावर प्रवेश द्यावा लागत आहे.
विशेष म्हणजे शारीरिक शिक्षण विषयातील प्राध्यापकांची संख्या 64 तर ग्रंथालय शास्त्र विषया करता 55 प्राध्यापक कार्यरत आहे. दोन्ही विषयासाठी संशोधक मार्गदर्शकांची एकूण संख्या 23 आहे,मात्र त्या प्रमाणात संशोधन केंद्र नसल्यामुळे मार्गदर्शकांना विद्यार्थी घेणे अडचणीचे ठरत असून अनेक पात्र विद्यार्थी संशोधना पासून वंचित होत आहेत
विशेष म्हणजे अमरावती विद्यापीठामध्ये पदवी स्तरावर शारीरिक शिक्षण विषयासाठी संशोधन केंद्रे दिली गेली असल्याची बाब संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंच्या लक्षात आणून दिली या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी अत्यन्त सकारात्मक प्रतिसाद देत गोंडवाना विद्यापीठातही सदर दोन्ही विषयासाठी पदवी स्तरावर संशोधन केंद्र उपलब्ध करून देऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स अससोसिएशन चे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोरलावार,डॉ.राजेंद्र गोरे, डॉ. राजू किरमिरे,डॉ.अभय लाकडे डॉ. प्रमोद बोधाने,प्रा.संजय राऊत,डॉ.शर्मा, डॉ.कैलास भांडारकर सिनेट सदस्य डॉ.प्रगती नरखेडकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते