- लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
आज संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट असून मोठ्या प्रमाणात विनाश होणार असून जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय येथे जगातील सर्वात मोठया लोकशाहीची राज्यघटना लिहणारे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच. बी.मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वामन टेकाम व विश्वनाथ धोटे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग सांगितले, बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा माधुरी पेटकर यांनी केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी मेहनत घेतली