लोकदर्शनआटपाडी ; 👉राहूल खरात
कुपोषण निर्मूलनासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया- सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील
आटपाडी ग्राम आरोग्य स्वच्छता व पाणीपुरवठा समिती अंतर्गत सभेचे आयोजन आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर १ विठ्ठलनगर नंदिवाले वसाहत येथे करण्यात आले होते.
कुपोषण संपवुन सदृढ व सशक्त बालक बनवून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करूया, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचे काम कौतुकास्पद असून कुपोषणमुक्तीसाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत असे मत सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी सरपंच यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचा आर्थिक विकास करणेसाठी महिलांनी सक्षम बनावे, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आधारस्तंभ बनण्यासाठी नवनविन संकल्पना आत्मसात करून विकासाच्या प्रवाहात सामिल होण्याचे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले.
या सभेस ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश मरगळे, श्री. बाळासाहेब मेटकरी तसेच अंगणवाडी सेविका सौ. सरस्वती पाटील, सौ. चव्हाण, शिंदे मॅडम आशा सेविका सचिव सुमय्या मुरसल, शेखभाभी, सोनाली चव्हाण, दिपाली महामुनी, निता ऐवळे, तसेच यासभेस मोठ्या संख्येने परिसरातील माता पालक भगिनी व भागातील लाभार्थी उपस्थित होते.