लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕महावितरणच्या २०१३ च्या परिपत्रकाची करून दिली आठवण.
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या भारनियमन समस्येवर उपाय योजना करण्यासंदर्भात आज महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत विश्रामगृह राजुरा येथे बैठक घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना महावितरण कंपनीच्या २०१३ च्या परिपत्रकाची आठवण करून दिली. यानुसार क्षेत्रातील रात्रीचे भारनियमन चुकीचे असून अधिकाऱ्यांनी वस्तूस्थिती वरिष्ठांना अवगत करून भारनियमन बंद करावे कारण राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती हे तालुके नक्षलग्रस्त भागात येत असुन सदर परिसर हा जंगल व्याप्त व यातील काही भाग डोंगराळ आहे. आपले विभागाचे पत्र कमांक एस ई./ एल.एम./ एल.एस./१०००. दिनांक १४ जानेवारी २०१३ चे परीपत्रक क. ४६ मधील अनुच्छेद ६.१ ६.२ मध्ये दर्शविल्यानुसार नक्षल प्रभावित परीसरात सायंकाळी ६.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत भार नियमण करू नये, असे नमुद असतांना सुध्दा विज वितरण विभाग जाणीवपूर्वक परीसरातील नागरकांना त्रास देण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळेस भार नियमण करीत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात औद्योगीक सिमेंट कारखाने व कोळसा खाणी मोठ्या प्रमाणात असल्याने उष्णतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, लहान मुलांना व विज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्हयातील तापमान जवळपास ४५ ते ४६ अंश राहत असुन नागरीकांना उष्णतेचा फार मोठा त्रास होत असतो. तसेच जंगल व्याप्त परीसरात जंगली प्राण्यांचा वावर असुन विजे अभावी रात्रीचे वेळेस बाहेर झोपल्यास अनेकावर जंगली प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपुर जिल्हयामध्ये सर्वात मोठे विज निर्मीती केंद्र असून सूध्दा चंद्रपुर जिल्हयातील नागरीकांना भार नियमणाचा त्रास सहन करावा लागत आहे. किमान उन्हाळयाचे दिवसात रात्रीचे भार नियमण बंद करावे व नियीमत विद्युत पुरवठा करण्यात यावा अन्यथा परीसरातील नागरीकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी जि प सदस्य अब्दुल हमीद अब्दुल गणी पटेल, महावितरण चे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता तेलंग, चिवंडे मॅडम प्रा. सुग्रीव गोतावळे, धनराज चिंचोलकर, विकास देवाडकर, महावितरण विभागाचे अधिकारी, उपकार्यकारी अभियंता राजुरा, गडचांदूर, गोंडपिपरी, जिवती आदींची उपस्थिती होती.