लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर– सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयात सामाजिक क्रांतीचे प्रणेते, समाजपरिवर्तनाचे जनक, शेतकऱ्यांचे कैवारी बहुजनांच्या विद्येचे प्रणेते यांच्या जयंतीचा कार्यक्रम दिनांक ११ एप्रिल२०२२ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या प्रबोधनपर भाषणातून ज्योतीबांच्या सामाजिक कार्याचे व शैक्षणिक कार्याचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर मांडले ,विद्येविना मती गेली l मतीविना नीती गेली l नीतीविना गती गेली l गतीविना वित्त गेले l वित्ताविना शूद्र खचले | एवढा अनर्थ एका अविद्येने केले याचा मतितार्थ मांडतांना विद्येचे महत्त्व अनन्य साधारण आहे हे ज्योतीबांनी पटवून दिले म्हणून जोतिबांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी वसा घ्यावा व पुढील आयुष्यात ज्योतीबांच्या,सावित्रीबाईंच्या राजश्रीशाहू महाराजांच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आत्मसात करून वाटचाल करावी असा संदेश दिला.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक प्रशांत खैरे यांनी आपल्या भाषणात ज्योतिबाला अभिवादन करताना स्वलिखित कवितेतून ज्योतीबांच्या विचार कसा बहुजन उद्धारक होता हे मांडले तर पर्यवेक्षक गाडगे प्रमुख अतिथी होते. ज्योती चटप, प्रा. मेहरकूरे, सुरेश पाटील, प्रा.प्रमोद वांढरे , प्रा. जहीर , कु.ताकसांडे . इत्यादींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन महेंद्र कुमार ताकसांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिनकर झाडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नामदेव बावनकर, सोनटक्के , सातारकर , राजेश मांढरे, जी. एन. बोबडे . माधुरी उंमरे, श्रीमती शेंडे , यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
,,