लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕*गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स संघटनेची मागणी.!
राजुरा-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठातील विविध प्राधिकरण निवडणूक 2022 करिता अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळावर निवडणुका करिता विद्यापीठाने नाव नोंदणी बाबत 12 एप्रिल 2022 पर्यंत मुदत दिलेली आहे.
सदर कालावधी पूर्वी सर्व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी,प्राचार्य, प्राध्यापक,विद्यापीठ अध्यापक यांची माहिती विद्यापीठात करणे अपेक्षित असल्याची विद्यापीठाने अधिसूचना काढलेली आहे. त्याचबरोबर परीक्षा संबंधित कामाचा अनुभव प्रमाणपत्र बाबतची ही अधिसूचना विद्यापीठाने काढली आहे एकाच वेळेस या सर्व बाबींची पूर्तता होत नसल्याने प्राध्यापकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच उष्ण तापमान व दळणवळण साधनांचा प्रश्न लक्षात घेता तथा इतर कारणामुळे अनेक महाविद्यालयांनी व प्राध्यापकांनी विद्यापीठातील प्राधिकरण निवडणूक करिता नाव नोंदणी बाबतची प्रक्रिया पूर्ण करू केलेली नाही याबाबत अनेक प्राध्यापकांनी यंग टीचर्स संघटनेकडे मुदतवाढ मागण्याची सूचना केलेली आहे
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने विद्यापीठातील विविध प्राधिकरण निवडणुकी 2022 करता नाव नोंदणीची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे या संबंधीचे निवेदन कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनिल चिताडे यांना संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन नाव नोंदणी करता मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.संजय गोरे सचिव डॉ. विवेक गोरलावार डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. राजू किरमिरे, प्रा.संजय राऊत डॉ.कैलास भांडारकर,डॉ.अभय लाकडे,डॉ.प्रमोद बोधाने, सिनेट सदस्य डॉ. प्रगती नरखेडकर डॉ.शर्मा तथा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते