लोकदर्शन 👉 मोहन भारती
दिनांक 10/04/ 2022 ला धनगर अधिकार कर्मचारी संघटन महाराष्ट्र राज्य कडून*
*माननीय श्री महादेव जानकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्ष चे अध्यक्ष, विधान परिषद आमदार
*यांची राणी कोठी सिव्हिल लाईन नागपूर येथे सकाळी 11 वाजता भेट घेण्यात आली आणि साहेबांना सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.*
*धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्याध्यक्ष श्री अनिल कुमार ढोले साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्येविषयी साहेबांशी सविस्तर चर्चा केली, चर्चा करत असताना खालील विषयावर विशेष लक्ष घालण्यात आले होते.*
*1)अधीसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्नावर निवेदन.*
*2)माननीय उच्च न्यायालयातून अधिसंख्य पदाला स्थगिती प्राप्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढी मिळण्याबाबत.*,
*3) पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षण लागू करणे.*
*4) धनगर जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र गैर धनगरांना न देणेबाबत.*
*5)राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षेत धनगर समाजाचे विद्यार्थ्यांना अमर्याद संधी मिळणेबाबत.*
*6)भटक्या विमुक्त जमातीची जात निहाय जनगणना करणेबाबत.*
*7)नॉन क्रिमिलिअर ची मर्यादा वाढवून 12 लक्ष करणेबाबत.*
*8)केंद्रात भटक्या विमुक्त जमातीची स्वतंत्र यादी व स्वतंत्र आरक्षण लागू करणेबाबत.*
*9)केंद्रात आदिवासी प्रमाणे सोई-सुविधा व योजना भटक्या विमुक्त जमातीला लागू करणेबाबत.*
*वरील सर्व विषयावर सविस्तर चर्चा धनगर अधिकारी-कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्याध्यक्ष अनिल कुमार ढोले साहेब, उपाध्यक्ष श्री विलास डाखोळे, महासचिव शरद उरकुडे, कोषाध्यक्ष उज्वल रोकडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र बुधे,कार्याध्यक्ष यशवंत कातरे, राज्य सदस्य नाना पांडे, जिल्हा सचिव किशोर चिडे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर बांबल सर,प्रसिद्धीप्रमुख श्याम ढोले, राजेंद्र बुधे, कैलास उरकुडे, मधुसूदन ढोले, चंद्रकांत शेटे, अशोक चिव्हाणे, नंदकिशोर काळे, बबलू भुजाडे,हरिभाऊ रानडे, गजानन हारेकर, सूर्यभान कुहिटे चर्चा करताना उपस्थित होते.*