सिडस्,पेस्टीसाईड फर्टिलायझर डिलर संघटनेचे अध्यक्ष सोनवणे सचिव- हरिराम कव्हळे।

लोकदर्शन वालूर,ता.१०(बातमीदार):महादेव गिरी

⭕वालूर- सिडस् पेस्टीसाईड व फर्टिलायझर डिलर संघटनेच्या निवड झाल्यानंतर तालुकाध्यक्ष विलास सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

वालूर (ता.सेलू) गावातील गजानन कृषी केंद्राचे संचालक विजय सोनवणे यांची सिडस् फर्टिलायझर ॲण्ड पेस्टीसाईड असोसिएशनच्या सेलू तालुकाध्यक्ष तर कृषीमित्र ट्रेडिंगचे हरिराम कव्हळे यांची सचिवपदी निवड.
महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टीसाईड असोसिएशन (माफदा) जिल्हा कार्याध्यक्ष अनुप गुप्ता यांच्यासह तालुक्यातील कृषी केंद्र चालकांच्या उपस्थितत तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष विलास सोनवणे,सचिव हरिराम कव्हळे,कार्याध्यक्ष शेख महेबूब, उपाध्यक्ष आनंद काबरा, सहसचिव सचिन जोशी, कोषाध्यक्ष मधूकर मालकर, संरक्षक कोषाध्यक्ष सुशील कुलकर्णी,सल्लागार राजेश लोया,प्रविण काला,शैलेश तोष्णीवाल, विष्णू सपाटे,रामराव गजमल आदींचा नुतन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.निवड झाल्यानंतर सर्वांचे स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here