धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून नियमांचे पालन करीत साजरे करा,,, पोलिस निरीक्षक, सत्यजीत आमले. !                  

लोकदर्शन 👉 मोहन भारती।

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजान हे धार्मिक सण शांतता व सुव्यवस्था राखून,नियमांचे पालन करत उत्स्फूर्तपणे साजरे करावे, मिरवणुकीत डी, जे,चा वापर करू नये, कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी समाजसेवकांनी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.
याप्रसंगी नगर परिषदेच्या अध्यक्षा सविताताई टेकाम,उपाध्यक्ष शरद जोगी,प्रामुख्याने उपस्थित होते, शांतता समितीच्या सदस्यांनी विविध विषयावर पोलीस निरीक्षक आमले यांच्याशी चर्चा केली, समस्या मांडल्या, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.
सभेला विविध राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते, नगरसेवक, सभापती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here