लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।
माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषतः राजुरा निर्वाचन क्षेत्र औद्योगिक कोळसा खाणी,सिमेंट कारखाने असलेले क्षेत्र असून,अतिशय उष्णतामान जास्त आहे,उष्णता ४४°वर गेलेले असतांना अचानक पणे सूचना न देता ग्रामीण भागात राजुरा तालुक्यातील बामनवाडा,विरूर स्टेशन,चिंचोली,अंतरगाव, कविठपेठ व कोरपना तालुक्यातील नारंडा, पारडी, तसेच परिसरातील लाईन रात्री ११ वाजता पासून लोडशेडिंग सुरू केल्यामुळे शेतकरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग बेहाल झाले आहेत,या करिता विद्युत वितरण विभागाने या समस्या संदर्भात लक्ष द्यावे व लोडशेडिंग थांबवावी अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वा खाली आज एका शिष्टमंडळाने विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अधिक्षक अभियंता श्री.देशपांडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व राजुरा कोरपना तालुक्यातील विजेची समस्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली व माजी आमदार अँड.धोटे यांनी निवेदन दिले, यावेळी भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर हे याप्रसंगी उपस्थित होते.
पुढे माहिती देताना माजी आमदार अँड.धोटे यांनी सांगितले की,नियमाप्रमाणे ठराविक वेळेत सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ न करता मध्यरात्री करत आहे,लोडशेडिंग मुळे जनतेत तीव्र असंतोष झाला आहे,या सर्व बाबी तातडीने लक्ष देण्यात यावे,व लोडशेडिंग तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा जनतेच्या अक्रोशाला समोर जावे अशेही यावेळी त्यांनी सांगितले.