लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,
आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सी एस सी केंद्र चालकांनी आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शनची लाभदायक योजना सर्वसामान्य नागरिकांना समजावून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सी एस सी ई गवर्णनन्स चे राज्य प्रमुख वैभव देशपांडे यांनी केले.चंद्रपूर जिल्हा सी एस सी ग्राम उद्योजक सह संस्थेद्वारे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. गडचांदूर येथे कोरपना, जिवती व राजुरा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या सोबत सी एस सी ई गवरनेन्स चे सी ई ओ ऋषिकेश पाटणकर दिल्ली, प्रोजेक्ट मॅनेजर निलेश कुंभारे,जिल्हा समन्वयक स्वप्नील सोनटक्के , सोसायटी चे अध्यक्ष विनोद खंडाळे, सचिव उद्धव पुरी हे मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनीही आपल्या भाषणातून केंद्र चालकाने सर्व सेवा उत्तम पद्धतीने नागरिकांना कशी द्यावी या बद्दल समयोचित मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट केंद्र चालक म्हणून सुरेशजी कपले नांदा ,गुलाब राठोड गडचांदूर, रियाझ शेख राजुरा ,श्री धनवलकर बल्लारशाह यांचा पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व प्रमुख पाहुण्यांचे केंद्र चालकांनी स्वागत केले, प्रास्ताविक अध्यक्ष विनोद खंडाळे यांनी केले, संचालन सहसचिव हबीब शेख यांनी केले तर आभार सचिव उद्धव पुरी यांनी मानले.