श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात हरिपाट व गीता पारायणाचा नामजप.

लोकदर्शन 👉मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- ०६/०४/२०२२ :-* श्री दिगंबर मुनिनाथ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सुरू असलेले श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांचे ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवास वारकरी संप्रदयातील हरीपाट व गीता पारायण नामजपाचा कार्यकम करण्यात आला.
श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या ४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दि. ०५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ५ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७ हरी किर्तन व सकाळी ७ ते ८ गीता पारायण, सकाळी ८ ते ९ ज्ञानेश्वरी, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद व सायंकाळी ६ ते ७ हरी किर्तन, ७ ते ८ कुरापाटी (महाराजांचे) तेलगु प्रवचन आणि रात्री ८ ते ९ चिट्याल महाराजांचे गुरु महिमा व रात्री ९ ते १० पर्यंत भावनाऋषी भजनी मंडळाचे भजन गीताचे कार्यक्रम, हरी जागर करण्यात आला. वरील सर्व कार्यक्रम ह.भ.प. आनंद गुज्जर महाराज, ह.भ.प. अंजय्या दुस्सा महाराज, ह.भ.प. सिद्राम पोला महाराज, ह.भ.प. मारूती जिंदम महाराज, ह.भ.प. नरसिंग बिरकूल महाराज यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमास भाविक बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
*———————–  -*——————– –*—————- **फोटो मॅटर :- श्री दिगंबर मुनिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासानिमित्त हरिपाठ व गीता पारायण करतांना ह.भ.प. आनंद गुज्जर महाराज व भाविक बंधु – भगिनी दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here