राजुरा येथे राज्यस्तरीय उपवर, उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕विश्वकर्मा (झाडे) सुतार महासंघ द्वारे आयोजन.

राजुरा  :– महाराष्ट्र विश्वकर्मा (झाडे) सुतार महासंघ द्वारा ओमसाई मंगल कार्यालय राजुरा येथे दिनांक ९ एप्रिल २०२२ रोज शनिवारला सकाळी ९: ३० वाजता ३४ वे राज्यस्तरीय उपवर, उपवधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र वनकर हे असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभु विश्वकर्मा (झाडे) सुतार समाज संस्था राजुराचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गजानन बाबुराव भटारकर, गडचांदूर चे अध्यक्ष रामकृष्ण वनकर हे असणार आहेत.
राजुरा येथे होणाऱ्या या मेळाव्याला सर्व विश्वकर्मा सुतार समाजातील उपवर, उपवधू व समाजबांधवांनी सक्रिय सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रभु विश्वकर्मा (झाडे) सुतार समाज संस्था राजुराचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गजानन बाबुराव भटारकर यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *