कोरपना तालुक्यात अवैध उत्खनन प्रकरणी पन्नास कारवाया

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕कोरपना तहसीलदारांची धडक मोहीम ; 70 लाखाचा मिळाला महसूल
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपना,,,
-अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी वर्षभर कोरपना येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार महेंद्र वाकलेकर व महसूल पथकाने केलेल्या पन्नास कारवाईतून शासनाला भरघोस महसूल मिळवून दिला आहे.
शासनाने रेती घाटाचे लिलाव न झालेल्या ठिकाणी
अवध रित्या गौण खनिज उत्खनन करणे व त्याची वाहतूक करणे यावर निर्बंध घातले आहे. याला न जुमानता अनेक तस्कर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करायचे त्यांच्यावर चाप बसावा. यासाठी कोरपना तहसीलदार यांचे नेतृत्वात कोरपना व गडचांदूर मंडळ अधिकारी, साजाचे तलाठी , कोतवाल , महसूल कर्मचारी यांच्या सहकार्यातून अनेक कारवाया अवध रित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर वर्षभरात करण्यात आल्या. यासाठी विशेष मोहीम राबवून पथक गठित करण्यात आली. पैनगंगा , वर्धा नदी व अनेक नाल्यातून होणाऱ्या अवध रित्या रेती वाहतूकीवर दिवस-रात्र पाळत ठेवून कारवाई करण्यात आली. बरेचदा या पथकावर तस्करांकडून धमकी देत हल्ले सुद्धा करण्यात आले. तरी मात्र त्याला न घाबरता तस्करा विरुद्ध कारवाईची मोहीम वर्षभर अविरत राबवण्यात आली. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच प्रमाणात अवध उत्खननावर चाप बसला. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान केलेल्या पन्नास कारवाईतून शासनाला ६९ लाख ८१ हजार रुपयाचा विक्रमी महसूल मिळवून देण्यात आला.तर तात्पुरता परवाना दंड या माध्यमातून १९ लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे कोरपना तालुक्याच्या महसुली उत्पन्नात ही मोठी भर पडली. कर्तव्यदक्ष तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिम व कारवाई यामुळे ही कामगिरी यशस्वी झाली. यासाठी त्यांना जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रपूर ,उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे ही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

अशा झाल्या वर्षभरात कारवाया

एप्रिल महिन्यात चार , मे महिना सात , जून एक , जुलै दोन , ऑगस्ट दोन, सप्टेंबर सात, ऑक्टोबर चार, नोव्हेंबर तीन, डिसेंबर दोन, जानेवारी पाच , फेब्रुवारी नऊ , मार्च चार अशा पन्नास धडक कारवाई वर्षभरात करण्यात आल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *