लोकदर्शन 👉 मोहन भारती
=====================================
गडचांदूर ,,
स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय, मानवतेची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा विचार ज्यांनी जगभर पोहोचवून भारतीय संस्कृतीला जगात स्थान मिळवून दिले. जवळपास४०वर्ष लोककल्याणकारी प्रशासन राबवित भारताला सुखी, समृद्ध, संपन्न बनवून जागतिक दर्जाची नालंदा, तक्षशिला सारखी ज्यांनी विद्यपीठे स्थापन करून या देशात सुवर्णयुग निर्माण केले.युद्धात कधीही पराभव न पत्करणारा जगाच्या इतिहासातील सर्वात महान राज्यकर्ता चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती गडचांदूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संयुक्त जयंती समारोह समिती गडचांदूर च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कवडुजी सोनडवले होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ हेमचंद दूधगवळी, विश्वास विहिरे, प्रा सोमाजी गोंडाने, नगरसेवक राहुल उमरे, नगरसेविका तथा आरोग्य सभापती अश्विनी कांबळे,, दशरथ डांगे, प्रा डॉ सुखदेवे, भूषण वाघमारे, बाबाभीम उमरे उपस्थित होते.
तथागत बुद्ध, सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून व पंचशील ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रशांत खैरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा किर्तीकुमार करमनकर यांनी तर आभार कैलाश मैस्के यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवानंद मुन, सचिन कांबळे, विक्की मुन, समाधान सोनकांबळे, प्रकाश मुन, सुरेश ताडे, देविदास मुन, सचिन सोनटक्के, संघर्ष रामटेके, महेश ससाणे, चंदू दुरडकर यांनी मोलाचे सहकार्य केले.