चंद्रपूरच्‍या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विविध सुविधांसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

⭕*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द केला पूर्ण*

⭕*वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीम उपलब्‍ध होणार.*

चंद्रपूर येथील ऐतिहासिक पवित्र दीक्षाभूमी परिसरातील भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीमसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री यांनी बौध्‍द धर्मीय बांधवांना दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे. सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात पवित्र दीक्षाभूमी परिसरात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्‍यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्‍या पदाधिका-यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात २ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या माध्‍यमातुन दीक्षाभूमी परिसरात आकर्षक भवनाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. या भवनाच्‍या उद्घाटनप्रसंगी येथे वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्‍टीम तथा साऊंड सिस्‍टीम बसविण्‍याची मागणी करण्‍यात आली. आ. मुनगंटीवार यांनी त्यावेळी उपस्थितांना शब्द दिला. आ. मुनगंटीवार यांनी यासाठी ५० लक्ष रूपयांचा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी सामाजिक न्‍याय विभागाकडे सतत पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनादरम्‍यान दिनांक १४ मार्च २०२२ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्‍न सुध्‍दा उपस्थित केला. अधिवेशन संपताच काही दिवसातच यासाठी आ. मुनगंटीवार यांनी प्रयत्‍नपूर्वक ५० लक्ष रू. निधी मंजूर करविला.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ व्‍या जयंतीनिमीत्‍त राज्‍यभर विविध कार्यक्रमांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केला. ज्‍या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्‍दधर्मीय बांधवांना दीक्षा दिली त्‍याच ठिकाणी २ कोटी रू. निधी खर्चुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्‍यापाठोपाठ त्‍याठिकाणी विविध सुविधासांठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करवून भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. तसेच बौध्‍दधर्मीय बांधवांना दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here