आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते अंत्योदय च्या लाभार्थीना धनादेशाचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– मिशन वात्सल्य योजने अंतर्गत अंतोदय योजनेच्या लाभार्थींना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण तहसील कार्यालय राजुरा येथे कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आले. यात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थींना 20,000 (विस हजार रुपये) चे धनादेश देण्यात आले. अशा एकूण बारा लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरीत करण्यात आले. तर AYY योजने अंतर्गत एकूण अकरा लाभार्थ्यांना अंतोदय शिधापत्रिका वाटप करण्यात आले. सर्वांसाठी घरे या योजने अंतर्गत एकूण सहा लाभार्थ्यांना जागेचे पट्टे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, संवर्ग विकास अधिकारी किरणकुमार धनावडे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले, नायब तहसिलदार गांगुर्डे, पुरवठा विभाग निरीक्षक सोनी गंभीरे, सं. गां. नि. योजना अध्यक्ष साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, सिनेट सदस्य अजय बतकमवार, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, संतोष गटलेवार यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here