लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
नवी दिल्ली ÷ माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी* यांचेसोबत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री *श्री हंसराजजी अहिर* यांनी *नवी दिल्ली* येथे भेट घेतली. बल्लारशाह येथील पिटलाईन पूर्ण झाल्याबरोबर *बल्लारशाह ते मुंबई* थेट रेल्वे गाडी सुरु करीत असल्याबद्दल आभार मानले. ही गाडी *CSMT* पासून सुरु करण्याची व वेळ बदलविण्याची मागणी केली. सोबतच सध्या सुरु असलेली *पुणे ट्रेन* बल्लारशाह येथून आठवड्यातून ३ दिवस सुरु करणे, ताडोबा एक्स्प्रेस व्हाया माजरी-आदिलाबाद सुरु करणे, बल्लारशाह-वर्धा पॅसेंजर नागपूर पर्यंत करणे, वर्धा-अमरावती पॅसेंजर गाडी बल्लारशाह पर्यंत करणे, जनरल तिकीट सुरु करणे, बंद असलेल्या पॅसेंजर सुरु करणे, गोंदिया-बल्लारपूर पॅसेंजर गाडीच्या फेऱ्या वाढविणे, बंद असलेली जबलपूर-चांदा फोर्ट गाडी सुरु करणे, चंद्रपूर रेल्वे स्थानकावर सर्व सुपरफास्ट गाड्यांचे थांबे देणे, दक्षिण भागातून कागजनगर पर्यंत येणाऱ्या सर्व गाड्यांचा विस्तार बल्लारशाह पर्यंत करणे, चंद्रपूर-चांदा फोर्ट रेल्वे लाईन तसेच चंद्रपूर,बल्लारशाह,चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत व अन्य विषयावर सविस्तर चर्चा केली. मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले.