लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात 12 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. संपूर्ण जगात 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून याप्रसंगी क्षयरोग निर्मूलन संबंधी आरोग्य कर्मचारी श्री चुधरी तसेच आरोग्य सेविका चंदनखेडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले क्षयरोगाची लक्षणे त्यावरील औषध उपचार व इलाजा संबंधी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून क्षयरोगासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी सर्वप्रथम इ.स. 1882ला क्षयरोगाच्या जीवाणू चा शोध लावला 24 मार्च रोजी क्षयरोगावरील त्यांच्या प्रबंधाला जागतिक शास्त्रज्ञाच्या परिषदेत मान्यता मिळाली म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. 2025 पर्यंत
क्षयरोगाचे महाराष्ट्रातून निर्मूलन करायचे असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज मुख्याध्यापक काळे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर
क्षयरोगासंबंधी खाजगी रुग्णालया पेक्षा सरकारी दवाखान्यातच उपचार करावा व स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची तसेच मित्रमंडळी ची काळजी घ्यावी व स्वच्छतेचा मूलमंत्र
अंगीकारावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.