लोकदर्शन 👉 राहुल खरात
मुंबई प्रतिनिधी:
आदिवासी पारधी समाजचे अशिक्षित महिला शेवराआई ज्ञानदेव भोसले, उरुळी कांचन, ता. हवेली जिल्हा पुणे, येथील रहिवासी आहेत. त्यांना लहानपणा पासूनच प्राण्यां विषयी कुतूहल व अधिक माहिती जाणून घेण्याची ईच्छा त्यांना होती. प्राण्यांसाठी राना वनात भ्रमंती करतांना त्यांना विविध जीव जंतु प्राणी आढळत परंतु त्यांची हत्या किंवा कैद विक्री न करता त्यांच्या विषयी माहिती प्राप्त करून सुरक्षित ठिकाणी जंगलातच सोडून देण्याचे कार्य त्या करीत असे.बर्याच वेळा गायींची प्रसूती, आजारी गुरे,प्राण्यांची डॉक्टरांकडून चिकित्सा करून जंगलात सोडण्याचे कार्य त्या करित असतात. प्राण्यांच्या प्रति त्यांची आत्मीयता व जिव्हाळा ह्याची दखल मा.संजय शर्मा गो रक्षक सेवा ट्रस्ट, मुंबई ह्यांनी घातली व त्यांना राजभवनात सन्मान सोहळ्यात येण्याचे आमंत्रण दिले.
आयोजित सन्मान सोहळ्यात मा. भाजप नेता तरुण राठी, (उत्तर प्रदेश फिल्म बोर्ड उपाधयक्ष) व मा. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ह्यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा सन्मान देऊन गौरविण्यात आले . ह्या वेळी राजभवनात आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले सह,शासकीय महिला बचत गटाचे सदस्यां सौ. सुरेखा तुकाराम भोसले देखील उपस्थित होत्या. आदिवासी पारधी समाजात शेवराईंचे सर्वत्र कौतुक होत आहे.