लोकदर्शन 👉 राहुल खरात
आटपाडी ;
: गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किंमती च्या निषेधार्थ आंदोलन……..
वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाल्याने सामान्यांच्या त्रासात पुन्हा भर पडली आहे. रशियातून कमी दराचे कच्चे तेल आयात केल्यानंतर आता गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता नव्हती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष बॅरल कच्चे तेल अतिशय माफक दरात आयात केले. या आयातीमुळे अमेरिकेने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचे कुठेही उल्लंघन झाले नाही. असे असताना सुद्धा आता कच्च्या तेलाच्या वाढीव किंमतीचा दाखला देऊन घरगुती गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय?, ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत न्यूनतम होती, तेव्हा देखील मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी केले नाहीत आणि आता वाढीव किंमत आहे, असे सांगून मोदी सरकार घरगुती गॅस व इतर इंधन दरवाढ करत आहे, हे योग्य नाही, हे निषेधार्य आहे आणि म्हणून आम्ही आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने या वाढत्या पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आज आंदोलन करीत आहोत . गैस सिलेंडर चे दर २०० रुपयेनी कमी करावेत आणि पेट्रोल डिझेल चे दर निम्म्याने कमी करावेत अशी आम्ही मागणी करीत आहेत . आमची ही मागणी केंद्र सरकार कडे पोहचवली जावी . ही विनंती .
इंजि अनिता पाटील.उपस्थिती महिला
उपाध्यक्ष सांगली जिल्हा माहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील तालुकाध्यक्ष अश्विनी कासार तालुका उपाध्यक्ष वैशाली वाघमारे सरचिटणीस पूजा गुरव जिल्हा सहसचिव सुजाता टिंगरे मनीषा पाटील उज्वला सरतापे अश्विनी ढोकळे नीता सावंत सुषमा खरात शितल खरात वैशाली वाघमारे वैशाली साबळे राणी कुठे सुजाता तोरणे स्वाती पुसावळे