लोकदर्शन 👉 राहुल खरात
क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.(बापू)) लाड जन्मशताब्दी वर्ष व स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष यानिमित्ताने समाजवादी प्रबोधिनी व व्ही.वाय.आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी नागराळे आणि परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने आज पासून रामानंदनगर तालुका पलूस जिल्हा सांगली येथे आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती व्याख्यानमालेचे कार्यवाह आदम पठाण सर यांनी दिली.ते म्हणाले की या व्याख्यानमालेचे उद्घाटन पुणे पदवीधर विधानपरिषद मतदार संघाचे आमदार मा.अरुण (अण्णा) लाड यांच्या हस्ते होणार असून या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे संपादक व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी हे गुंफणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे ‘राजकारणाची दशा आणि दिशा’ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते ॲड सुभाष पाटील हे गुंफणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे “सातारा प्रतिसरकारची चळवळ’तर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक कॉम्रेड मारुती शिरतोडे हे गुंफणार असून त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे ‘स्वातंत्र्य चळवळीतील उपेक्षित क्रांतिकारकांचे योगदान’. रोज सायंकाळी ठीक पाच वाजता कामगार भवन रामानंदनगर या ठिकाणी व्याख्यान होणार असून या व्याख्यानमालेचे प्रायोजक डॉक्टर अमोल पवार व श्री धोंडीराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पलूस हे आहेत. तरी परिसरातील सर्व जिज्ञासू आणि अभ्यासूनी या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक संघटना प्रतिनिधी मा.व्ही.वाय.आबा पाटील,डॉक्टर अमोल पवार, मानसिंग (नाना) पाटील, आदम पठाण, ॲड.सतिश चौगुले, कॉम्रेड मारुती शिरतोडे,कवी किरण शिंदे ,कॉम्रेड दीपक घाडगे जयवंत मोहिते, प्रा.रवींद्र येवले, शहाजी चव्हाण, प्राचार्य तानाजीराव चव्हाण,कवी संदिप नाझरे ,प्रा.उत्तमराव सदामते, रमेश लाड ,दगडू जाधव हिम्मतराव मलमे, कृष्णात यादव आदींनी केले आहे.