लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २५/०३/२०२२ :-* केंद्रातील मोदी सरकारने कामगारांना संरक्षण असलेले कायदे रद्द करून कामगार विरोधी धोरण स्वीकारल्याने अखिल ===भारतीय कामगार संघटना कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या २८ व २९ मार्च २०२२ असे दोन दिवस संपाला महाराष्ट्र कामगार सनेचा सक्रीय पाठिंबा आहे. असे पत्र शिवसेना प्रणित अखिल भारतीय कामगार संघटना महासंघ संलग्न असलेला महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी अच्छे दिन आयेंगे म्हणुन आणि जीवनाश्यक वस्तुंचे भाव कमी करणार असे घोषणा करून सत्तेवर आल्यानंर गरीबानांच पुर्ण उध्वस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. म्हणजे गरीब कामगारांचे संरक्षणाचे व हक्काचे कायदे रद्द करून भांडवलदारांच्या कायदा करण्यामध्ये मोदी सरकार धन्यता मानत आहे. इतकेच नव्हे तर गरीबांसाठी असलेले अनेक योजना रद्द करून खाजगीकरण करण्याचा प्रयत्नात आहे. यामुळे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार दशोदडीला लागले आहेत. सोलापुरात जनतेत चालु असलेले विडी, यंत्रमाग व असंघटित कामगारांचे उद्योग मोदी सरकारच्या धोरणामुळे बंद पडले आहे. त्यामुळे सर्व कामगार बेकार झालेले आहेत. म्हणून अखिल भारतीय कामगार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या २८ व २९ मार्च २०२२ या २ दिवसाच्या भारत बंदला महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पुर्ण पाठिंबा देण्यात येत आहे. असे पत्रक महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दीस दिली आहे.