By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
नागपूर:- येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक आयु. चेतन किशोर टेंभूरकर यांना “लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी”, जालंधर पंजाब यांच्या वतीने पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
आयु, चेतन टेंभूरकर यांनी “एक्सपरिमेंटल इन्व्हेस्टीगेशन ऑन वेल्डींग अॅन्ड वेल्डबिलीटी ऑफ ३१६ एल. ऑस्टेन्टीक अॅन्ड ४३० फेरिटीक स्टेनलेस स्टील डिसीमिलर मेंटल जॉईन्टस्” या विषयावर आपला शोधप्रबंध विद्यापिठाला सादर केला होता. विद्यापिठाने हा शोधप्रबंध स्वीकृत करून चेतन टेंभुरकर यांना पी. एच. डी. ही पदवी प्रदान केली.
डॉ. चेतन टेंभूरकर यांच्या या शोधकार्यात जालंधर येथील विद्यापीठाचे विद्वान पर्यवेक्षक डॉ. रविंद्र कटारिया आणि नागपूरचे सहपर्यवेक्षक डॉ. सचिन अंबादे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. उभय मार्गदर्शकद्धयांच्या वस्तूनिष्ठ मार्गदर्शनामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो. अशी प्रांजळ कबुली डॉ. चेतन टेंभूरकर यांनी या निमित्ताने व्यक्त केली. याशिवाय चेतनचे वडील किशोर टेंभूरकर आणि आई शशीकला टेंभूरकर यांची प्रेरणा तथा पत्नी आयु. कोकीळा यांचे अविरत सारल्थ्य, मुले कु. कियांश व धर्विक यांचे असीम आनंदी भावस्पर्श यामुळे मला हे यश प्राप्त करणे सहज सुलभ झाले. याबरोबरच आप्तेष्ट आणि मित्र परिवार यांच्याही भरपूर शुभेच्छा लाभल्या. हे सर्व माझ्या यशाचे वाटेकरी असल्याने मी या सर्वांचा अत्यंत ॠणी असल्याचे डॉ. चेतन या प्रसंगी म्हणाले.
डॉ. चेतन टेंभूरकर यांना पी.एच.डी. मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, दिक्षाभूमी परिवार संस्था, त्रिरत्न हायस्कूल, बेझनबाग बुद्धविहार समिती, बेझनबाग गृहनिर्माण सहकारी संस्था आदि संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.