लोकदर्शन 👉 राहुल खरात
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत कला विज्ञान महाविद्यालय, आटपाडी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर जांभुळणी, तालुका आटपाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या पाचव्या दिवशी प्रबोधनात्मक कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते मा. शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, ‘ रक्तशय मुक्त भारत करणे ही युवकांची आजची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.’यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी, प्रा. भारती देशमुखे यांनी सांगितले की,’ प्रत्येक व्यक्तीने सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करावे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यानंतर जगाचा विचार करावा. यावेळी प्रा. चंद्रकांत हुलगे यांनी ही आपले अनमोल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, बळीराजा फाउंडेशन, जांभुळणीचे अध्यक्ष, शिवराम मासाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका, काजल म्हारगुडे हिने केले. कार्यक्रमाचे आभार, राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका, लक्ष्मी जाधव हिने मानले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जांभळीच्या सरपंच, संगीताताई मासाळ, बापू वाघमारे, अध्यक्ष, तंटामुक्ती संघटना, जांभुळणी, लक्ष्मी घागरे, जयश्री झांजे, सदस्य, बळीराजा फाउंडेशन, जांभुळणी, याच बरोबर जांभुळणी गावातील सर्व ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.