लोकदर्शन 👉 राहूल खरात
जांभुळणी येथे कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करत असताना, मराठी विभाग प्रमुख, प्रा. बालाजी HB वाघमोडे यांनी सांगितले की, धर्मा पेक्षा अनेक पटीने देश मोठा आहे. जर एखाद्या धर्माचे तत्वज्ञान देश हिताच्या आड येत असेल किंवा त्यामुळे मानवतेची व समाजाची हानी होत असेल तर, तो धर्म संबंधित देशातील सर्व जनतेने नाकारला पाहिजे. जांभुळणी येथे
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रबोधन कार्यक्रमाचे चौथे पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बालाजी वाघमोडे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी, प्रा. भारती देशमुखे यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. नागेश चंदनशिवे यांनी केले. यावेळी जांभूळणीच्या सरपंच, सौ संगीता शिवराम मासाळ, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सुनीता वाघीरे, बळीराजा फाऊंडेशनच्या सदस्या, जयश्री झांजे, सौ. लक्ष्मी घागरे, समाज सेविका, जांभुळणी
शिवराम मासाळ, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन, जांभुळणी, मा. शिलोत्तम देशपांडे, माजी सैनिक, मा. अर्जुन वाकसे, यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन, काजल म्हारगुडे, साक्षी माने, प्राजक्ता गोडसे, विश्वास मरगळे, सोमनाथ बोराडे, देण्यास घागरे, राहुल बाड व अभिजीत धोत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मा. शिवराम मासाळ यांनी मानले.