लोकदर्शन 👉 राहुल खरात
कला विज्ञान महाविद्यालय, आटपाडी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जांभूळ येथे २१ ते २७ मार्च, 2022 येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यानी शासनाच्या वतीने सामान्य व्यक्तींना मिळणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगितली. तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आरोग्यदायी जीवन पद्धतीवर आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. नागेश चंदनशिव, हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयं सेविका, कु. प्राजक्ता गोडसे हिने केले; तर प्रास्ताविक स्वयंसेविका कु. काजल म्हारगुडे हिने व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार यानी मानले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जांभुळणीच्या सरपंच, संगीता शिवराम, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी, प्रा. भारती देशमुखे, सौ लक्ष्मी घागरे, डॉ. त्रिशाला भोसले, शिवराम मासाळ व गजानन पावले हे मान्यवर उपस्थित होते.