लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕विविध समस्यांचे निवेदन देऊन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा आंदोलनाचा इशारा*
घुग्घुस नगर परिषद समस्यांचे माहेरघर बनल्याने *भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे* यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मुख्याधिकारी अर्शिया जुही यांना विविध मागण्याचे निवेदन दिले, समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र.4 व 5 मधील विकास कामाचा समावेश करण्यात आला नाही या संदर्भात भाजपातर्फे दोन वेळा निवेदन देण्यात आले परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने भाजपातर्फे दिनांक 16/01/2022 ते 23/01/2022 पर्यंत सात दिवस तीव्र उपोषण करण्यात आले नंतर उपोषणाची सांगता करतांना 1.40 करोड रुपयांचे विकास कामे करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदतर्फे देण्यात आले परंतु आता पर्यंत कामे सूरू करण्यात आले नाही. विकासकामे सोमवार पर्यंत सुरु न केल्यास नगर परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी निवेदनातून दिला आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद असलेले हायमास्ट लाईट सुरु करणे, केमिकल नगर येथील तुटलेली नाली व सिमेंट कांक्रिट रस्ता दुरुस्त करणे. बंद असलेल्या आरो मशीन त्वरित सुरु करणे, अश्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
नगर परिषदेच्या उदासीनते बाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, भाजपाचे विनोद चौधरी, शाम आगदारी, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, श्रीकांत सावे, मल्लेश बल्ला, निरंजन डंभारे, अनंता बहादे, शंकर सिद्दम, राजेंद्र लुटे,धनराज पारखी, सतीश कामतवार, असगर खान उपस्थित होते