By : लोकदर्शन 👉 राहुल खरात
*●उदघाटक मा.अनिल वैद्य माजी न्यायधीस , नाशिक * निवेदन : प्रा. भीमराव गायकवाड .
*निमंत्रक* परिवर्तन विचार मंच, नागपूर
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चार शिलेदार , विश्वासू सहकारी थोर साहित्यकार मराठी साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात, महाकवी वामनदादा कर्डक, धम्म सेनापती वामनराव गोडबोले, त्यागमूर्ती नानक चंद रतू या चार महापुरुषांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला प्रेरणादायी राहावी म्हणून परिवर्तन विचार मंच ने दिनांक १०/४/२०२२ रविवार दुपारी २:३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह उरवेला कॉलोनी वर्धा रोड नागपूर येथे परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.उदघाटक मा. अनिल वैद्य माजी न्यायधीस नाशिक आहेत. _________________________ *अनिल वैद्य,एम ए ,एल एल बी,माजी न्यायाधीश ,यांचा परिचय*
अनिल वैद्य सर मुळचे
वर्धा जिल्ह्यातील असून
त्यांचे एम ये एल एल बी पर्यँत नागपुर येथे शिक्षण झाले व त्यांनी नागपूर येथे 8 वर्ष वकिली केली सध्या नाशिक येथे स्थायिक आहेत .त्यांचे नागपुरात ही घर आहे म्हणजे ते नागपूर, वर्धा व नाशिक असे तीन गावचे रहिवासी आहेत(विनोदाने)
नागपुरात वकिली करतांना त्यांनी दैनिक लोकमत ला १९९३ ९४ च्या दरम्यान कोर्ट कचेरी हे सदर लेखन केले. जनवादला कोर्टाची पायरी हे सदर लेखन केले.वयाच्या 21 व्या वर्षी 1981 ला त्यांची त्यांची राहुल ही कादंबरी वर्धेहुन प्रकाशित झाली होती ती फार लोकप्रिय ठरली.
नागपुरात वकिली करतांनाच
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत न्यायाधीश पदावर नियुक्तीझाली
त्या नंतर
,त्यांनी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, नाशिक,पुणे,मुंबई, ठाणे इत्यादी न्यायालयात न्यायदानाचे कार्य केले आहे, त्यांनी विविध कायदेविषयक शिबिर व कार्यशाळेत मार्गदर्शन केले आहे, सर्व सामान्य नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी म्हणन अनेक नियतकालिकात व समाज माध्यमातून लेखन केले.त्यांचे लोकमत, सम्राट,लोकनायक,महानायक, बहूजन सौरभ वर्तमानपत्रात लेखन केले आहे, त्यांनी कायदा या विषयावर अनेक पुस्तके लिहली,त्यांचे कायदा हे पुस्तक महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या पुस्तकाच्या 14 आवृत्या प्रकाशित झाल्या तर त्यांचे महिला व कायदा हे पुस्तक महिलांना आपल्या अधिकारांची विपुल माहिती देणारे असून त्याही पुस्तकाच्या 3 आवृत्या प्रकाशित झाल्या,
त्यांचे समता प्रकाशन नागपूर यांनी अट्रोसिटी ऍक्ट हे पुस्तक प्रकाशित केले ते सुप्रसिद्ध असून त्या पुस्तकाच्या 3 आवृत्ती प्रकाशित झाल्या,बौद्ध विवाह कायदा, धर्मांतरित बौद्ध व न्यायालयाचे निर्णय आणि धर्मांतरित बौद्धांच्या अरक्षणाचा गंभीर प्रश्न,समान नागरी कायदा की बौद्ध विवाह कायदा व इतर अनेक पुस्तके प्रकाशीत झाले आहे, अशा रितीने कायदा व सामाजिक विषयावर त्यांचे आजपर्यंत 16 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.ते महाराष्ट्र राज्याच्या बौद्ध विवाह कायदा समितीचे सद्यस्य होते.शासकीय वसंतराव नाईक महामंडळाचे विधी सल्लागार होते.
ते भिवंडी महानगरपालिका कर्मचारी संगगटनेचे,रोस्टर चळवळ, बहूजन विद्युत पावर ,ग्राहक संघटना,आईचा हक्क इत्यादी
विविध संस्थेचे विधी सल्लागार आहेत.
तर नाशिकच्या पोलीस अकडेमीला त्यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रीत केले आहे.
जनसामान्यांना आपल्या अधिकारांची माहिती व्हावी या साठी त्यांनी समर्पित कार्य केले आहे.
सामाजिक व धार्मिक कार्यात विद्यार्थी जीवना पासून सक्रिय आहेत. त्यांनी अनेक सभा सम्मेलनात मार्गदर्शन केले आहे.
विशेषतः बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावे या स्वसन्मान चळवळी च्या कळीच्या मुद्द्याचा ते नेहमीच पाठपुरावा करित आहेत.
त्यांना विविध सामाजिक संघटनांनी सन्मानित केले आहे . त्यांना समाजभूषण व धम्मरत्न पुरस्काराने सन्मानीत केले आहे