लोकदर्शन 👉 मोहन भारती
———————————————-
गडचांदूर-
-देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग, सुखदेव ,राजगुरू सारख्या क्रांतीकारकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्यामुळेच मजबुत ब्रिटिश साम्राज्याचा पाया ढासळला. क्रांतीकारकांचे कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. असे मनोगत प्राचार्य डी आर काळे यांनी सावित्रीबाई फुले विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा प्रशांत खैरे, प्रा अनिल मेहरकुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे ,प्रा प्रमोद वांढरे,सुरेश पाटील, नामदेव बावनकर , प्रा अशोक सातारकर, ज्योती चटप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिदांना पुष्पमाला घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले तर आभार राजेश मांढरे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यर्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.