सावली :- लोकदर्शन 👉 मोहन भारती
माणुस कितीही मोठा असला तरी समाजाचे काही देणे असते ग्रामीण भागातील जनतेची सेवा आपल्या हातुन घडावी या भावनेतून डॉ चुनारकर मल्टीस्पेशालीस्ट हाॅस्पिटल व्याहाड (खु) चे संचालक डॉ चुनारकर दाम्पत्याने सोमवार दिनांक 21 मार्च ला मोफत आरोग्य, दंतरोग, व मुखरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील 145 रुग्णांनी सहभाग नोंदविला.
डॉ हितेश नामदेवराव चुनारकर दंत चिकित्सक यांनी शिबिरा दरम्यान रुग्णाची दंतरोग, मुखरोग,तोंडाचा कर्करोग, तोंडातून रक्त येणे, तोंडातील पांढरे चटटे येणे, तोंडात दोन पेक्षा अधिक बोट न जाणे, घसा दुखणे, हिरड्यानवर सुज येणे , दातातुन पस येणे अशा ५५ रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.या प्रसंगी डॉ हितेश यांनी दंत व मुखाची काळजी कशी घ्यावी या बाबत सविस्तर माहिती उपस्थित रुग्णांना दिली. तर डॉ प्रिती हितेश चुनारकर स्त्रीरोग, बालरोग तज्ञ तथा जनरल फिजीशीयन यांनी ९० रुग्णांची तपासणी करुन स्त्रीरोग, बालरोग, त्वचा रोग, मुतखडा , मूळव्याध, पोटाचे विकार, वात विकार, आदी आजारांवर उपचार करुन मोफत वाफाराही देण्यात आला. उंची व वजन, लसीकरण, डायट चार्ट यावर प्रकाश टाकुन आपली आरोग्याची काळजी कशी घ्यावी या बाबत रुग्णांना सविस्तर माहिती दिली. या दरम्यान उपस्थित रुग्णांची रक्तदाब, मधुमेह, बिएमआय, आॅक्सिजन लेवल,यांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात तालुक्यातील बहुतांश गावातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या जनतेनी शिबीरात येऊन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबीराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीते करीता परिचारिका अंजली गेडाम,फर्माशिस्ट लोकेश भोजपुरे, सहाय्यक गुरुदेव बट्टे, राकेश,सुदिक्षा कूडवाले, तनुश्री वाघाडे यांनी सहकार्य केले.