लोकदर्शन 👉 राहुल खरात
*⭕शाळांच्या जागतिक जलदिन प्रतिज्ञेत घेतला सहभाग*
*⭕तालुका स्तरीय शिक्षक स्व क्षमता प्रशिक्षण वर्गास भेट व मार्गदर्शन*
सकाळ सत्रात शाळा सुरु झाल्यानंतरपलूस तालुक्यात प्रथमच तालुक्यातील पलूस शहरात असणार्या जिल्हा परिषद शाळा नंबर 1, जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ,जिल्हा परिषद शाळा नंबर 3 ला सांगली जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी अचानक भेट दिली. आज जागतिक जल दिनाच्या निमित्ताने तिन्ही शाळातील सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापकांनी जल प्रतिज्ञा घेतली त्यात शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांनी सहभाग घेतला. तसेच पाचवी ते आठवी चे तालुका स्तरावर सुरू असलेले विषय शिक्षकांच्या शिक्षक स्व क्षमता प्रशिक्षण वर्गास भेट दिली. शिक्षकांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रशिक्षणवर्गात शिक्षकांकडून कृतीयुक्त उपक्रम करून घेतले. त्यामुळे शिक्षकांच्यात उत्साह निर्माण झाला. यावेळी शाळा नंबर १,शाळा नंबर २, शाळा नंबर३ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा नंबर एकचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण ,शाळा नंबर 2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, शाळा नंबर 3 च्या प्रभारी मुख्याध्यापिका वंदना सनगर, पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदय कुमार रकटे, उपक्रम शील शिक्षक मारुती शिरतोडे, गटसाधन केंद्रा कडील विषय तज्ञ वर्षा पुदाले, सुवर्णा थोरात, धनंजय भोळे ,अरुण कोळी,विनोद आल्हाट,बन्नै यांचेसह सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक शाळातील शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.जागतिक जल दिनाचे महत्त्व मारुती शिरतोडे यांनी सांगितले तर उपस्थितांना जल प्रतिज्ञा मुख्याध्यापक राम चव्हाण यांनी दिली.