लोकदर्शन 👉 राहुल खरात
*⭕23 मार्चला जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात येणार निवेदन*
. शुक्रवार दिनांक 18 मार्च 20 22 रोजी एसटी वाचवा शिक्षण वाचवा, कृती समिती मधील सहभागी जन संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक खानापूर तालुक्यातील वाझर येथे मारुती शिरतोडे यांच्या कॉम्रेड सदन मध्ये पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते कॉ.धनाजी गुरव होते. सदर बैठकीत एसटी चा बरेच दिवस चाललेला संप ,त्याचा महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेवर विद्यार्थी वर्गावर होत असलेला परिणाम यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,शेतकरी संघटनेचे खानापूर तालुका अध्यक्ष महेश बनसोडे, डाव्या आघाडीचे प्रतिनिधी देवकुमार दुपटे, पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी दीपक पवार, सत्यशोधक बहुजन आघाडी चे प्रतिनिधी कॉम्रेड विलास साठे, एसटी कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी दिनेश माने उपस्थित होते. या बैठकीत 23 मार्च या शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या स्मृती दिनादिवशी दुपारी तीन वाजता सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून जिल्ह्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी व एस.टी.वाचवा ,एस.टी वाढवा,एसटी वाचवा शिक्षण वाचवा कृती समितीमधील संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन धनाजी गुरव यांनी केले. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार विलास साठे यांनी मानले.