लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी: 👉महेश कदम
शिमगा आणि कोकण..
शिमगा म्हणजे कोकणातील श्वास.. गणपती सणानंतर कोकणातील चाकरमान्यांना वेध लागतो ते शिमग्याचे.. मग त्यासाठी दोन दिवस का होईना कोकणी माणूस गावाला जाणारच. कोकणात शिमगा साजरा करण्याच्या प्रथा प्रत्येक जिल्हय़ात थोड्या वेगळाच अनुभवाला येतो,
शिमगात होळी ह्या सणाला अधिक महत्त्व आहे. कोकण हे नैसर्गिक सौंदर्य ने नटलेला आहे. ईतिल माती व नाती टिकून रहातात म्हणुन होळी ह्या सणाला मुंबईतील व अनेक ठिकाणी रहिवासी असलेले चाकरमणी कोकणात धावून येतात.
अशाच कोकणातील ता. महाड, जि. रायगड, गाव वाकी ईथे असलेली ग्रामदैवत नवसाला पावणारी आई सोमजाई देवस्थान मंदिर आहे. आई सोमजाई देवीची पाषाण मुर्ती ही ईतिहास पिढी काळापासूनच प्रचलित आहे. अनेक जुनी परंपरा व पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा केली जाते. आई सोमजाई देवी हे जागरूक देवस्थान आहे. म्हणून अनेक पिढी पासुन लोकं भक्ति भावाने श्रद्धेने आईची पुजा अर्चना करतात, होळी ह्या सणात आई सोमजाई ची पालखी प्रतेक गावात घरोघरी फिरते, पालखी सजवली जाते, आईची खणा नारळाणे ओटी भरली जाते. तिचा वाजत गाजत स्वागत केला जातो, गुळाल उधळत फटाके वाजवले जातात, रस्त्यात येणार्या र्भाविकांना दर्शन दिला जातो, अंगणात रांगोळी व सजावट केली जाते, प्रतेक गावात ती वस्तीला असते. आरती, कीर्तन, भजन, पुजा, महाप्रसाद केला जातो. मान सन्मानाने तिची भक्ती व जयघोष केला जातो, आपल्या मनातील जी ईच्छा असेल ते नवस केला जातो, नवस पुर्ण झाल्यावर तीची ओटी भरली जाते. अनेक जण तिच्या दर्शनाला आतुरतेने येतात मग तो मंत्री असो कि सामान्य माणूस, उच्च व गरीब असो. जाती भेद व अहंकार वगळता हीथे सर्व एक समान होतात व आईच्या चरणी नतमस्तक होतात.
आई श्री.सोमजाई देवस्थान च्या वतीने वर्षानुवर्ष आईचा कार्यक्रम केला जातो. आई श्री. देवी सोमजाई ही सवयंभु व पुरातन जागृत देवस्थान आहे. देवीचा महिमा आपल्या सर्व भक्तांना ज्ञात आहे. सदर देवीची पालखी उत्सव हे शुक्रवार दिनांक: १८|३|२२ ते शनिवार दि: २६|३|२२ पर्यंत संपन्न होणार आहे. तरी आपण आपल्या सर्व कुटुंब व मित्र परिवारा सह ह्या सोहळा मध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण समस्त विश्वस्त व गावकरी यांनी केले आहे,
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे
शुक्रवार दि: १८|३|२२, सकाळी १० ते ११वा. पालखी सजावट (गादीवर) नंतर पालखी सोमजाई मंदिराला भेट व प्रदक्षिणा होऊन शेवते गावाकडे प्रस्थान, रात्री गावठण येथे वस्ती.
शनिवार: १९ ता. सकाळी पालखी मिरवणूक गावठण व रात्री नानेमाची येथे वस्ती. रविवार: २०ता. सकाळी, ७ ते ५वा. पालखी मिरवणूक नानेमाची व नानेमाची आवाड, रात्री शेवते येथे वस्ती, सोमवार: दि. २१ता. शेवते येथे पालखी मिरवणूक, रात्री आंब्याचा माळ येथे वस्ती, मंगळवार दि: २२ता. आंब्याचा माळ येथे मिरवणूक व रात्री खरकवाडी येथे वस्ती, बुधवार: २३ता. खरकवाडी येथे पालखी मिरवणूक, त्यानंतर रोहिदासवाडी येथे पालखी मिरवणूक व शेदुरमळई रेथे वस्ती. गुरुवार २४ ता. शेदुरमळई येथे पालखी मिरवणूक, नंतर नारायण वाडी येथुन प्रस्थान व नांद्रुकवाडी येथे वस्ती. शुक्रवार: २५ ता. नांद्रुकवाडी येथे पालखी मिरवणूक, पेडामकरवाडी पालखी मिरवणूक नंतर शिवाजी नगर येथे पालखी मिरवणूक व वस्ती. शनिवार: २६ ता. रोजी सकाळी देवीच्या गादीवर पालखी विसर्जन होणार आहे.
या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन श्री. सोमजाई देवस्थान चे कार्यकरणी श्री. संजय गंगाराम कदम (अध्यक्ष) श्री. प्रकाश चंद्रु दरेकर (उपाध्यक्ष), श्री.श्रीरंग भागोजी भोसले (सचिव) श्री. अमोल भाऊ जाधव (खजिनदार) तसेच विश्वस्त श्री. मोहन रामचंद्र म्हामुणकर, श्री. प्रदीप रघुनाथ म्हामुणकर, श्री. प्रभाकर दिनकर कदम, श्री. दिपक यशवंत कदम, श्री. गणपत विठोबा सालेकर, श्री. सदाशिव दगडु मोरे, श्री. रोहिदास रामा जाधव, श्री. बबन शिवराम मोरे, श्री. सुरेश मोतीराम म्हामुणकर, श्री. द्वारकानाथ जाधव सर (सरपंच) व समस्त गावकरी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण पालखी मिरवणूक उत्सव कोविड नियमाचे पालन करून होणार आहे. अशी खबरदारी गावकरींनी घेतली आहे. आई सोमजाई चा उदो उदो.