लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे क्रीडा संमेलन नुकतेच झाले,यामध्ये स्थानिक महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयने घवघवीत यश संपादन केले आहे, सर्व स्पर्धा मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, कबड्डी स्पर्धेत उपविजेता राहिला, शुभकांत शेरकी यांच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात चांगली अटीतटीची लढत झाली,
एकेरी कॅरम स्पर्धेत सुयोग खोब्रागडे विजेता ठरला, दुहेरी कॅरम स्पर्धेत सुयोग खोब्रागडे व शिवशंकर दुबे यांनी उपविजेता पद पटकावले.
कुलगुरू डॉ, बोकारे,कुलसचिव डॉ, अनिल चिताडे यांच्याहस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले,
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात सर्व विजेत्या चे कौतुक करण्यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिता चिताडे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,प्रभारी प्राचार्य पटले,डॉ, अनिस खान,प्राचार्या रश्मी भालेराव, प्रा, अशोक डोईफोडे, मुख्याध्यापक धनराज मालेकर होते.उपस्थित अतिथीनी महाविद्यालयाला यश मिळवून दिल्याबद्दल खेळाडू व मार्गदर्शक प्राध्यापका चे अभिनंदन केले.