लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
*पुरूषांपेक्षा महिलांची सहनशीलता जास्त असून दिलेली कोणतीही जबाबदारी संपूर्ण तन्मयतेने पार पाडीत असतात. यांचाच प्रत्यय कोरोना संसर्गजन्य महामारीच्या तिव्र लॉकडाऊन आणि शारीरिक अंतराच्या काळात अम्बुजा फाऊंडेशन उपरवाहीच्या औद्योगिक कार्यशाळेत विविध विषयांत प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातून प्रज्ञा तावाडे, पुणे येथे कोमल चुनारकर, पुणे येथे, प्रशिका बांबोडे, पुणे येथे, प्रणाली सोनटक्के, मुंबई येथे, सांची उमरे, मुंबई येथे, भाग्यश्री कुमरे, पुणे येथे, प्रज्ञा येमूलवार, पुणे येथे अश्विनी बोधे, पुणे येथे, अमृता टेकाम, पुणे येथे, कोमल गेडाम, हैदराबाद येथे, शिवानी सातपुते, मुंबई येथे स्वताच्या पायावर उभ्या राहून कार्यरत आहेत.*
*मुलींना समानता आणि प्रोत्साहन मिळावे तसेच मुलींच्या बाबतीत असमानतेची वागणूक, भावना न ठेवणाऱ्या यांच्या पालकांचा सहभाग व आनंद द्विगुणित करण्यासाठी अम्बुजा फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वरील महिला विद्यार्थीनीचा स्मृती चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुनिता खडसे ह्या होत्या. बक्षीस वितरण सन्माननीय अतिथी च्या हस्ते करण्यात आले, संचालन नरेश सुभे यांनी केले.*
*सदर कार्यक्रमास मंगी, उपरवाही, हरदोना, पिंपळगाव, नारंडा, बेलगाव, हिरापूर इत्यादी भागातील महिला सरपंच आणि गावातील उपस्थिती वाखाणण्याजोगी होती.*