लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ आक्रमक*
*⭕कामगारांच्या जागृकतेसाठी निदर्शने*
येथील चंद्रपूर क्षेत्र वेकोली कामगारांचा पूर्ण पगार वेकोलीने आयकरच्या नावाखाली कपात केल्याने,कामगार वर्गात संतापाची लाट पसरली आहे.कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाने(इंटक)कंबर कसली असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही अस्थापनेतील कामगारांचा दैनंदिन खर्च भागावा म्हणून शासनाने न्यूनतम वेतन अधिनियम लागू केला आहे.या नियमानुसार त्या त्या कामगाराला कपात करून कमीत कमी एक चतुर्थांश रकम मिळणे बंधनकारक आहे.असे असताना वेकोलीने आयकरसाठी पूर्ण पगार कपात केल्याने चंद्रपुर वेकोली क्षेत्रातील 3 खुल्या खाणी व 3 भूमिगत खाणीतील किमान 5000 कामगार कुटुंब अडचणीत आले आहेत.या प्रकारामुळे घर चालवावे कसे,मुलांची शालेय फी व इतर खर्च कसा भागेल असा प्रश्न कामगारांना पडला आहे
सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार,काही वर्षांपूर्वी कामगारांचे पगारपत्रक तयार करण्याचे कंत्राट एका सॅप नावाच्या कम्पनीला केंद्र शासनाने दिले.आणि संपूर्ण कोल इंडियात सॅप कामगारांचा पगार तयार करू लागली.चंद्रपुर क्षेत्रातही हा प्रकार लागू झाला.परंतु मागील 8 महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांना पगारपत्रक कसे करावे,आयकरची रकम कशी कपात करावी हेच कळेनासे झाले.परिणामी आपल्या अंगावर येऊ नये म्हणून कामगारांचा पूर्ण पगारचं कापण्यात या अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.सॅपच्या या धोरणामुळे कुणाला 23 रुपये,कुणाला 100 रु तर कुणाला 0 रुपये पगारात समाधान मानावे लागले.
*सिटू,आयटक,एचएमएस व भामसंने दिली मान्यता.*
वेकोली कामगारांच्या पगारातून आयकर भरण्यासाठी दर 3 महिन्याने पगार कपात करण्याची परंपरा होती.ही कपात 11 महिन्याचा हिशेब करून केली जात होती.परंतु चंद्रपुर क्षेत्रात सॅपने याला बगल दिली.अडचण निर्माण झाल्यावर वेकोली प्रशासनाने सिटू,आयटक,एचएमएस,भामसं व इंटक ला तोडगा काढण्यासाठी निमंत्रित केले.इंटक वगळता इतर 4 कामगार संघटनांनी पगार कपात करण्यास मान्यता दिली.या प्रकारामुळे आता कामगार संतप्त झाले आहे.
*राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाचे निदर्शने सुरू*
4 कामगार संघटना व वेकोली प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाने(इंटक)निदर्शने सुरू केले आहे.14 मार्चला उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय,15 मार्चला जी एम ऑफिस,16मार्चला सर्व ओपन कास्ट येथे निदर्शने केल्यावर 17 मार्चला अंडर ग्राउंड माईन्स समोर क्षेत्रीय अध्यक्ष चंद्रमा यादव,सचिव शंकर खत्री यांच्या नेतृत्वात निदर्शने केली जाणार आहे,अशी माहिती इंटकचे प्रचार प्रसार प्रमुख मुन्ना इलटन यांनी दिली आहे.
*एल आय सी व सोसायटीचा हप्ता परत करा.*
वेकोली प्रशासनाकडून मोठी चूक झाली आहे.सॅपची ही नाकामी आहे.आयकर कपात करताना कामगारांची एलआयसी व सोसायटीच्या हप्त्याची कपात केली जाते.ही रकम 3 महिने वेकोली कडेच असते.ती कामगारांना परत केली तर,कामगारांची गाडी रुळावर येऊ शकते.यासाठीच आमचे निदर्शने आहेत.
के के सिंग
केंद्रीय महामंत्री
राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ(इंटक)