यांचे मत* लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत इमारत बांधकाम कामगार सुरक्षा व दक्षता मार्गदर्शन शिबीर संपन्न*
गडचांदूर हे शहर औद्योगिक शहर म्हणून दूरवर नावलौकिक आहेत तसेच सिल्वर सिटी म्हणून सुद्धा ओळख निर्माण केली आहे यामुळे अनेक कामगार येथे पाहायला मिळतात शहरात वाढत्या इमारती मुले अनेक इमारत बांधकाम कामगार वाढत त्यांच्या सुरक्षा व त्यांची दक्षता काय या बद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत मार्गदशन शिबीर नुकतेच गडचांदूर शहरात पार पडले.
या कार्यक्रमात कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ च्या अनेक योजनाचा लाभ घ्यावा असे प्रमुख पाहुणे म्हणून बिडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना म्हटले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चंद्रपुर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर अंतर्गत सी.डी.सी.सी.बँक समोरील मोकळे मैदान गडचांदूर येथे मंडळाचे कल्याण आयुक्त मा.श्री. रविराज ईळवे साहेब, मा. श्री. नंदलाल राठोड साहेब विभागीय कार्यालय नागपुर तसेच मा.श्री. रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय चंद्रपुर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज दिनांक १५/०३/२०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम नोंदणी कृत कामगारांकरिता सुरक्षा दक्षता व जन जागृती मार्गदर्शन शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सतीश उपलंचीवार सामा. कार्यकर्ता गडचांदूर प्रमुख पाहुणे मा. सतीश बिडकर तालुका अध्यक्ष प्रहार संघटना गडचांदूर चंद्रकांत सोमवंशी अध्यक्ष विश्वकर्मा राजमिस्त्री फौंडेशन गडचांदूर हे होते तर व्याख्याते मा. श्री. अरविंद कोरे विदर्भ प्रदेश सचिव इमारत बांधकाम कामगार संघ गडचांदूर मा. श्री. सुनील गोंडे जिल्हा सचिव विदर्भ इमारत बांधकाम कामगार संघ गडचांदूर हे होते तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. श्री रामेश्वर अळणे कामगार कल्याण अधिकारीगट कार्यालय चंद्रपूर यांनी केले कार्यक्रमांचे सूत्र संचालन सुरेश इटनकर केंद्र संचालक यांनी तर मा. सौ. सविता वरखेडकर केंद्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी आभार प्रदर्शन केले.