*लोकदर्शन प्रतिनिधी 👉- हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे*
आधार कार्ड हे भारताचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.
नवजात मुलांसह ५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आधार कार्ड, अंगणवाडी शाळा, रायवाडी, लोणी काळभोर येथे मिळत असून, यूआयडीएआय (भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण) ने पालकांना नवजात मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी अगदी सोपी पद्धत सांगितली आहे. पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचे आधारकार्ड बनवताना ‘आई किंवा वडील’ या दोघांपैकी एकाचा आधार नंबर तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक असल्याची माहिती सरपंच सौ.माधुरीताई राजेंद्र काळभोर यांनी दिली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक उपाध्यक्ष श्री.अमित काळभोर, लोणी काळभोरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य – श्री.भरत काळभोर हे उपस्थितीत होते, व नवीन आधार नोंदणी करण्यासाठी आलेल्या पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असेही सरपंच माधुरी ताई काळभोर यांनी बोलताना सांगितले.