लोकदर्शन। 👉l मोहन भारती,,,,,,,,,,,,,,,,,,,
,◆जागतिक महिला दिनानिमित्य इको-फ्रेंडली कापड़ी सैनेटरी नैपकिन चे वितरण
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
चन्दनवाही येथे 14 मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत चंदनवाही (पंचायत समिति राजुरा अंतर्गत) आणि अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे आरोग्य आहार पोषण आणि मासिक पाळी विषयी आजार व स्वछता जनजागृती या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ कुलभूषण मोरे संचालक अर्थ फाउंडेशन यानी मार्गदर्शन केले ….
या प्रसंगी ग्राम पंचायत चंदनवाही यांचे तर्फे अपंग कल्याण निधी 5 % अंतर्गत साहित्य वाटप तसेच महिलांना अर्थ फाउंडेशन ने तैयार केलेले कापडी सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष-स्थानी—- सरपंच सो माधुरी चेनूरवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच श्री संदीप घोटेकर , ग्रामसेवक श्री दयानंद तिडके, मार्गदर्शक
डॉ. कुलभूषण मोरे( संचालक ,अर्थ फाऊंडेशन गडचांदूर ). सदस्यगण – मधुकर राठोड ,अनिता पोडे, भाविकां जिवतोडे ,मंदा मडावी, विजय धानोरकर , चंद्रकांत जिवतोडे ,रेणुका शेंडे होत्या. याप्रसंगी गावातील समस्त महिला व आशा वर्कर आणि किशोरी मुली उपस्थित होत्या .
ग्रामपंचायत चंदनवाही तर्फे अर्थ फाउंडेशन मधील सखी स्वराज्य अभियानांतर्गत तयार केलेले कापडी सॅनिटरी नॅपकिन पैड चंदनवाही येथील 100 किशोरी मुली आणि महिलाना कापडी सैनेटरी पैड वितरण करण्यात आले……आणि त्याचा वापर आणि महत्त्व यावर मार्ग्दर्शन करण्यात आले . हे कापड़ी नैपकिन पर्यावरण पूरक आणि रियुजेबल रिवाशेबल आहेत हे विशेष ..म्हणून जिवति व कोरपना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत महिलांना ह्या पर्यावरण पूरक कापड़ी सैनेटरी नैपकिन वितरण करण्याचे आवाहन डॉ मोरे यानी याप्रसंगी केले.