आम आदमी’ची सत्ता !!

By : Milind Gaddamwar

आपले राजकारण,खास करून काॅंग्रेस पक्षाची वाटचाल ही वंशपरंपरागत आलेले पक्षीय अधिकार वापरून स्वतःचीच माणसे राजकारणात पेरण्याची कुप्रथा जाणीवपूर्वक समाजात रूजविण्यात आलेली आहे.यांस बहुतांश पक्ष कारणीभूत ठरत आहेत.सध्यातरी ‘ आप ‘ पक्षात विकासात्मक राजकारण केले जात असल्याचे जनतेच्या लक्षात आलेले आहे. तसेच पिढीजात परिवारातील लोकांनाच आपले जागी नेऊन बसविण्याची स्पर्धा सध्यातरी नसल्याचे लक्षात येते आहे.याच कारणाने मोबाईल रिपेअर करणा-या एका गरीब कुटुंबातील माणसाने चरणजीतसिंग चन्नी सारख्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करून एका इतिहासाची निर्मिती केली आहे.असा इतिहास निर्माण करणे हे आम आदमीचेच काम आहे.राजकारण हा श्रीमंतांचा व पैशाचा खेळ आहे.हा भ्रम आम आदमी पक्षाने दिल्ली व पंजाब मध्ये मोडीत काढलेला आहे.व्यक्ती केंद्रीत राजकारण सुध्दा लोकशाहीस मारक ठरत असते.जे जवळपास सर्वच पक्षात पहायला मिळते आहे.लोकशाहीचा अर्थच जनतेला आजही कळलेला नाही.पक्षीय भेदाभेद,जातीय व धर्मीय समिकरणे,प्रांतवाद याने राजकारण ढवळून निघाले आहे.यांस काहीप्रमाणात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खिळ बसत असल्याचे चांगले लक्षण समोर आले आहे.
राजकारणात आपलेच घोडे समोर केल्याने सामान्य कार्यकर्त्यांवर वर्षांनुवर्षे होणारा अन्याय हा अजून तिव्र होतांना दिसून येत आहे. आज राजकारणात सुध्दा साधणं- सुचीता पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.शिक्षीत, सुसंस्कृत तरूणवर्गांनी समोर येऊन राजकारणात पाडला गेलेला चुकीचा पायंडा मोडून नविन इतिहास निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे.यासाठी जनमत जागृत करणे गरजेचे झाले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वतःला कायमचे कार्यकर्ते समजू नयेत.तर आम्ही पण सत्तेतील मुख्यभागी मुख्य पदांवर विराजमान होऊ शकतो ही खुणगाठ मनात पक्की बांधली गेली पाहिजे.यादृष्टीने कार्यरत झाले पाहिजे.लाॅफ्टर चॅलेंज स्पर्धेतील एक स्पर्धक भगवंत मान ज्या स्पर्धेत स्वतः नवज्योतसिंग सिध्दू हे या गेमचे प्रमुख अतिथी होते.त्यांना पंजाब मधील निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या धुळ चारून चारीमुंड्या चीत केलेले आहे.हे भारतीय लोकशाही व्यवस्थेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.अनेक रती महारतींना या निवडणुकीत जनतेनी घरचा रस्ता दाखवलेला आहे.या निवडणुकीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे.आपली लोकशाही ही प्रगल्भ होत असल्याचे हे लक्षणं आहे.राजकीय हेवेदावे,प्रतिदावे , सुडबुध्दीचे राजकारण यांस जनता कंटाळलेली आहे.तीला नविन पर्याय पाहिजे आहे.सशक्त नविन पर्याय दिला गेल्यास जनता त्यावर शिक्कामोर्तब करते हे पंजाब निवडणुकीतून सामोरे आले आहे.हा एक शुभसंकेत आहे.आता जनतेनी राजकारणातील प्रस्थापितांना ज्यांचे वय वाढत जाऊनही ज्यांना सत्तेचा मोह सोडवत नाही आहे.अश्यांना कायमचे घरी बसविले गेले पाहिजे.जनतेनी नविन दमाच्या शिक्षीत, सुसंस्कृत,कुठलेही आर्थिक,फौजदारी गंभीर आरोप नसलेल्या समाजाभिमुख कार्यशील तरूणाईला राजकारणात ओढून आणले पाहिजे.कौटुबिक पार्श्वभूमी राजकीय असलेल्यांना काही काळासाठी बंधने घातली गेली पाहिजेत.तरच ख-या अर्थाने लोकशाही व्यवस्थेला चांगले दिवस पहायला मिळणार आहेत.याची सुरूवात आता झालेली आहे.यामुळे आता राजकीय चिंता व्यक्त करण्याचे कारण उरलेले नाही.असे मला वाटते आहे.काॅंग्रेसची अधोगतीकडे होणारी वाटचाल ही
‘ घराणेशाही ‘ मुळे आहे.हे लक्षात घेऊन काॅंग्रेसने पुढची वाटचाल न केल्यास काॅग्रेस पक्षाला चांगले दिवस पहायला मिळणार नाहीत.हे अधोरेखित सत्य जाणून घेऊन पुढची वाटचाल केली गेली पाहिजे.तरच काॅंग्रेसला नविन पालवी फुटलेली पहायला मिळणार आहे.
****
मिलिंद गड्डमवार
ज्येष्ठ विचारवंत

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *