लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर/
कोरपना तालुक्यातील कुसळ येथे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हजरत दूल्हेशाह बाबा रहे.अलेह यांच्या वार्षिक उर्स उत्सव ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दि. १४,१५, व १६ तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येत आहे. दि. १४ ला ठीक ९. वाजता मिलाद शरीफ व कुराण खानी चे आयोजन करण्यात आले . दि. १५ ला सायंकाळी ४ वाजता कोरपना येथील मस्जिद येथून शाही संदल गावातून गश्त करीत कुसल येथे दर्गा शरीफ ला पोहोचून हजरत दुल्हेशाह बाबा यांच्या मजार वर चादर चढवण्यात येईल. या ठिकाणी दिवसभर लंगरचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ( भोजनदान) होणार आहे रात्री ९ वाजता जावेद सर राजुरा, यांचा मैफिल शमा कार्यक्रम होत आहे. तसेच दि. १६ ला गडचांदूर येथील युवक कमिटी चा शाही संदल थेट दर्ग्यावर पोहोचणार असून मजरावर चादर चढवण्यात येणार आहे तसेच लंगर (अन्न प्रसाद )वितरण करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता असलम साबरी यांचे भाचे वसीम साबरी यांची शमा मैफिल समारोह होणार आहे. आयोजकांनी वीज पाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले असून यात्रेनिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत आहे. हजरत दुल्हेशाह बाबा कुसळ हे तीर्थ स्थळ सर्वधर्मसमभावाचे व एकतेचे प्रतिक असून या ठिकाणी सर्व क्षेत्रातील सर्व धर्मातील भक्त श्रद्धेने हजेरी लावतात. कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबिद अली व इतर कोरोना नियमांचे पालन करत आहेत,
राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या कुसळ येथे चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, तसेच तेलंगणा राज्यातील धार्मिक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी सहभागी होतात,